|
 |
पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड नागपूर शहराच्या वैभवात आणि उत्पन्नात भर घालणारा भारतातला व आशिया खंडातील सर्वात मोठा सर्व सोयी आणि सुविधांनी परिपुर्ण असलेला लाखो मेट्रीक टन कृषि मालाची खरेदी-विक्री करणारा आणि कोटयावधी रूपयांची उलाढाल करणारा बाजार आहे. नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डचे नांव देशांत सर्वत्र कौतुकाने घेण्यांत येते. या बाजारपेठेमुळे शेतक-यांना त्यांच्या कृषि उत्पादनाचा क्रय-विक्रय करण्यासाठी सर्व सोयीनी युक्त असे, रास्त भाव देंणारे आणि अत्यंत विश्वासाचे असे, हक्काचे स्थान उपलब्ध झाले आहे.
|
 |
|

|
बाजार समितीच्या पदाधिका-यांच्या कल्पकेतून आणि दुरदृष्टिच्या नियोजनातून साकारलेल्या या कळमना बाजाराच्या व्यवस्थेवर समितीच्या कडक प्रशासकीय शिस्तीची आणि काटकसरीची छाप प्रत्येक ठिकाणी दिसून येते. भव्यतेतही कल्पकता, भविष्याचा वेध घेवून केलेले नियोजन आणि प्रशासनावर कठोर पकड हें या बाजाराचे वैशिष्ठ आहे. |
|
श्री.शरदचंद्रजी पवार, श्री.शंकरराव चव्हाण, श्री.वसंतदादा पाटील, बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे, श्री.नरेद्रजी तिडके, सहकार महर्षी मा.श्री.बाबासाहेब केदार (माजी ग्रामविकास राज्यमंत्री स्वतंत्र कारभार) आणि त्यांचे सहकारी श्री.द्वारकाप्रसाद कांकाणी, कै. श्री निळकंठराव नांदुरकर, श्री.हुकुमचंद आमधरे आणि इतर तसेच, यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीने आणि मार्गदर्शनाने तयार झालेला हा बाजार आवार पाहून पाहणारा आश्चर्याने थक्क होतो. या बाजारामुळे नागपूर हे कृषिमालाची आंतरराज्यीय बाजारपेठ तर झालेच सोबत विविध देशात कृषि माल निर्यात करण्याचे केंद्रही झाले आहे. |
|
 |
माती परिक्षण केंद्र |
 |
|
 |
माती परिक्षण केद्र |
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने इफ्को यांच्या सहकार्याने माती परिक्षण केंद्र उभारल॓ आहे. |
अधिक माहिती >> |
|
|
 |
जलशुद्धिकरण केंद्र |
 |
|
 |
जलशुद्धिकरण केंद्र |
कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूरन॓ स्वत:ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांचे सल्यानी तयार केली. |
अधिक माहिती >> |
|
|
|
|
|